मराठी विनोद...[ Marathi Jokes ]

Laughing Child
Laughing Child (Photo credit: lanchongzi)
​मराठी विनोद...

जनगणने साठी प्रगणक घरी आल्यावर सुरेखाबाईंनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पण
स्वत:चे वय काही केल्या सांगेनात.
तेंव्हा प्रगणक म्हणाला," अहो बाई असे काय करता. तुम्हाला तुमचे वय सांगावेच
लागेल."
सुरेखाबाई," त्या शेजारच्या कावळे बाईनी आपले वय सांगीतले का ?"
प्रगणक," होय."
सुरेखाबाई,"तर लिहून टाका ना तेवढेच."
आणि प्रगणकाने सुरेखाबाईंचे वय लिहीले "कावळ्या ईतके "

गोटया : आई, परी आकाशात उडू शकते?
आई : हो
गोटया : मग आपली रखमा (कामवाली) ... का नाही उडत?
आई : ती परी नाही आहे.
गोटया : पण बाबा तर तीला तू नसताना परी म्हणतात.
आई : काय????? मग आता बघच, उद्या सकाळीच उडून जाईल....

ट्रॅफिक पोलिसांनी कार थांबवली. 'अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू  आहे...
तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला ५००० रु.चं बक्षिस मिळतंय.
या रकमेचं तुम्ही काय कराल?'
कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.
ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका.. दारू पिऊन तो काय वाट्टेल ते बोलतो...
ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं... चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब जाऊ शकणार नाही...
तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का???

हवालदार : बाई, तुमची कमाल आहे. न घाबरता तुम्ही त्या चोराच्या मुस्कटात मारलीत.!!!!!........
बाई : तो चोर आहे, हे मला नंतर कळ्लं, मला वाटलं आमचे हेच आहेत..

८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता, मी माझ्या ऑफिसचा
फोन वापरतो मग एवढं बिल कस?
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते. मी
कशाला घराचा फोन वापरू.
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय. मी कशाला
घराचा फोन वापरू.
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग
एवढं बिल कस?

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

  1. ८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता, मी माझ्या ऑफिसचा
    फोन वापरतो मग एवढं बिल कस?
    बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते. मी
    कशाला घराचा फोन वापरू.
    मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय. मी कशाला
    घराचा फोन वापरू.
    कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग
    एवढं बिल कस?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा