English: Recipon Leo Français : Recipon Leo (Photo credit: Wikipedia) |
दोन छोटी मुलं बोलत उभी असतात.
पहिला: माझी आई सर्व्हिस करते...
दुसरा: माझी आई टेनीस खेळत नाही...
----------------------
एक दुधवाला दुध घेउन रस्त्याने जात असतो आणि अचानक तो दुध पिउन टाकतो... का??
कारण मागुन गाडी हॉर्न वाजवते, पी.पी..पी...पी !!
---------------------
पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय?
.....
.....
मिथुन 'चक्रवरती'
आणि
पाल 'भिंतीवरती'
----------------------
एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात तर एक मग दुसर्या मगाला काय म्हणेल
?
उत्तर: काय मग काय चाल्लय?
------------------------
मास्तर: बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव...
बंड्या: उसाचा रस काढणार्या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!!
------------------------
अलीबाबा गुहा शोधायला चालत निघतो,
चालुन चालुन खुपच दमतो,
चालता चालता
शेवटी एकदाची गुहा येते.
तर तो काय म्हणेल?
.
आली बाबा !!
------------------------
लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो. दुसर्या
दिवशी पेपर मधे फ्रंट पेज वर तो फोटो येतो. खाली लिहिलेले असते, लालू,
डावीकडुन तिसरा!!
------------------------
जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ?????
.
.
अरे
टॉम अँड जेरी सुरु होते ...
------------------------
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील???
"माऊ माऊ"!!
------------------------
गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु....
"70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय त नाय!!!"
-----------------------
पहिला मुलगा: माझे बाबा एव्हढे उंच आहेत की ते चालत्या विमानाला हात लावतात....
दुसरा मुलगा: माझे बाबा पण खुप उंच आहेत पण ते असला मूर्खपणा करत नाहीत ....
-----------------------
जर बसंतीची मावशी ठाकूरला राखी बांधते तर बसंती आणि ठाकूर मधे नातं काय?
....
अरे विचार काय करताय? ठाकूरला हातच नव्हते
-- Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
khup chan vinod ahet vachatana khup maja alli
उत्तर द्याहटवा