मोबाइलची काय काळजी घ्यायची ? [ How to take care of your Mobile? ]

Mobile Computing
Mobile Computing (Photo credit: mobilyazilar)
मोबाइलची काय काळजी घ्यायची ?

तातडीने कोणाला तरी अत्यंत महत्त्वाचा निरोप द्यायचा आहे आणि नेमका मोबाइल
बंद पडतो . बटणं डायल होत नाहीत , स्क्रीन निकामी होते किंवा आवाजच यायचा बंद
होतो . वारंवार असं घडायला लागलं की आपण थेट मोबाइल बदलण्याच्या निर्णयापर्यंत
येतो . पुन्हा आपण नवीन मोबाइलची काळजी न घेतल्याने घटनेची पुनरावृत्ती होते .
याला हॅण्डसेट नाही तर आपण जबाबदार असतो हे लक्षात घ्यायला हवं .

आपल्याकडील ऋतुमानानुसार मोबाइलचे आजारही बदलत असतात . उन्हाळ्यात बहुतांश वेळा
मोबाइलची बॅटरी निकामी होण्याचे प्रकार घडतात . तर पावसाळ्यात डिस्प्ले बिघडतो.
हिवाळा आपल्या आरोग्याप्रमाणोच मोबाइलच्या आरोग्यासही फारसा त्रास देत नाही .
आपल्या मोबाइलची काळजी घेणं ही अतिशय सोपी बाब आहे . त्यासाठी आपल्याला काही
खास वेळ बाजूला काढण्याची गरज भासत नाही . फक्त काही गोष्टींची गरज पूर्ण करणं
गरजेचं असतं .

पाणी आणि मोबाइल :
पाणी आणि मोबाइल या परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत , ही बाब मनावर चांगली ठसवून
घ्या . मोबाइलमध्ये चुकूनही पाणी जाऊ देऊ नका . विशेषत : पावसाळ्यात आपल्याला
ही गोष्ट जपावी लागते . यासाठी पावसाळ्यात प्लास्टिकच्या कव्हरमध्ये जरी आपण
मोबाइल ठेवला तरी तो सुरक्षित राहू शकतो . पाणी पितानाही मोबाइल लांब ठेवावा .
नंबर डायल करताना किंवा मोबाइल हाताळताना हात कोरडे असल्याची खात्री करून घ्या.
तसंच , मोबाइल वाळू पासूनही सुरक्षित ठेवा .

मोबाइल पाडू नका :
तुमचा मोबाइल चुकून किंवा इतर कुठल्याही कारणाने पडू देऊ नका . मोबाइलसारखा
पडल्याने त्याची बॉडी लूज होतात . यानंतर मोबाइल पाडत राहिल्यास बॅटरी आणि बॉडी
वेगवेगळे पडायला लागतात . यामुळे मोबाइलच्या व्हॉइस क्वालिटीवर खूप परिणाम होतो.
आपल्याला ऐकावयास त्रास होता किंवा समोरच्याला आपला आवाज खूप कमी ऐकू जातो .
यामुळे शक्यतो मोबाइल कव्हरचा वापर करावा . जेणे करून मोबाइल पडलाच तर , किमान
त्याचे दोन वेगळे भाग तरी होणार नाहीत .

अति चार्जिंग नको :
मोबाइलची बॅटरी नेहमी फूलच असावा असा अनेकांचा अट्टाहास असतो . यामुळे ते सतत
आपला फोन चार्जिंगला लावून ठेवतात . उन्हाळ्यात याची विशेष काळजी घ्यावी . १२
तासांच्यावर आपला मोबाइल कधीही चार्जिंगला ठेऊ नये . तसंच , तो ७० टक्के
डिस्चार्ज झाल्याशिवाय चार्जिंगला लावणं टाळा . कार चाजर्सपासून विशेषत :
मोबाइल गरम होण्याची शक्यता जास्त असते . यामुळे अगदी आवश्यक असल्यासच कार
चार्जिंगचा वापर करावा . जर फोन अधिक गरम झाला तर , फोनवर येणारे रेडिओ सिग्नल
तसेच त्याचे आवाजात रूपांतर करणारी यंत्रणा निकामी होऊ शकते .

चोरांपासून सावध :
मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला असे आपण वारंवार ऐकत असतो . पण मोबाइल चोरी होऊ
नये म्हणून आपण फारसे कष्टही घेत नाही . तसंच आपला मोबाइल हरवला तर , तो
शोधण्यासाठीही आपण प्रयत्न करत नाही . यासाठी एक छोटी क्लुप्ती आहे . जर
तुमच्याकडे तुमच्या मोबाइलचा आयएमइआय नंबर असेल तर मोबाइल सापडणं सोपं होतं .
मोबाइलमध्ये जर कोणी दुसरे कार्ड घातल्यावर ताबडतोब आपल्याला आपला मोबाइल
कोणत्या भागात आहे हे समजू शकते . आयएमइआय नंबरसाठी जर तुम्ही * टाइप केले की,
नंबर मिळतो . तो आपण आपल्याकडे कुठेतरी नोंद करून ठेवावा .

मोबाइलच्या हृदयाची काळजी :
मोबाइलचे हृदय म्हणजे तुम्हाला कळलेच असेल अर्थात बॅटरी . या बॅटरीशिवाय मोबाइल
वापरणे व्यर्थ आहे . यावेळेस आपल्याला नेटवर्क नसते त्यावेळेस मॅन्युअली
नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करू नये . तसेच आपण जर एखाद्या ग्रामीण भागात गेलो
असू आणि आपल्याला रेंज येत नसेल तर मोबाइल स्विच्ड ऑफ करून ठेवा . कारण नेटवर्क
शोधण्यासाठी मोबाइलची बॅटरी सर्वाधिक खर्च होत असते . शक्यतो वायब्रेशन बंद
ठेवणं , बॅकलाइटचा वापर टाळणं , ब्लूट्यूथ , वायफाय , इन्फ्रारेड यासारखे
फिचर्स गरज नसताना बंद करणं यामुळे बॅटरी कमी डिस्चार्ज होईल आणि त्याला
चार्जिंग कमी लागेल . यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढेल . बॅटरीला अति चार्जिंग देऊ नका . त्याचबरोबर
बॅटरी पूर्ण संपेपर्यंत शक्यतो चार्जिंग करायचंही थांबू नका . बॅटरीत पाणी जाऊ
देऊ नका , आपल्या मोबाइलची बटणे बिघडली असतील तर ती दुरूस्त करा . कारण अनेकदा
ती बटनं दाबली गेलेली असतात यामुळे बॅटरी न कळतपणे डिस्चार्ज होते .

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या