Trees (Photo credit: @Doug88888) |
फुले देतात
वृक्ष मानवाला
प्राणवायू देतात.
पण माणसं
मेल्यावर सुद्धा
वृक्षाला सरणाच्या
स्वरूपात नेतात .
आपल्या सरणाची
सोय म्हणून
दरवर्षी किमान
एकतरी झाड लावा
शुद्ध हवेचा आनंद घेत
दीर्घायुषी व्हा
नाहीतर जा अवेळी
आपल्या गावा
मग करा विचार
आणि लावा झाडे
होवून होवून
किती होतील खाडे
कामाच्या वेळी
झाडे लावा असं मी
कुठं सांगत फिरतोय ?
पण असा कोणता माणूस आहे
की जो वर्षभर चोवीस तास काम करतोय ?
------------कवी प्रशांत गंगावणे
( राष्ट्रीय अध्यक्ष - महाराष्ट्र ' वननिर्माण सेना ')
Good poem!
उत्तर द्याहटवा