Smiley detail (Photo credit: renaissancechambara) |
बाबा लहान असतानाची त्यांची सायकल पप्पूने दुरुस्तीसाठी नेली. सायकलची अवस्था
पाहून सायकलदुकानदार म्हणाला, "ही सायकल दुरुस्त होणं अवघड आहे.' त्यावर पप्पू
म्हणाला, "होईल की; कालच आम्हाला नेपोलियन बोनापार्टचा धडा शिकवला. त्यात तर
तो म्हणत होता की जगात काहीही अशक्य नसतं.' "मग त्याच्याकडेच घेऊन जा'
सायकलदुकानदार शांतपणे म्हणाला.
प्रामाणिकपणा ............
नोकर - साहेब केराच्या टोपलीत मला पाचशेच्या या पाच नोटा सापडल्या.
साहेब - मीच फेकून दिल्या त्या. नकली आहेत.
नोकर - हो, मला माहितीय म्हणून तर मी त्या तुम्हाला देतोय.
दारूडा...............
एक दारूडा रस्त्यावरून जात असतो. समोरून त्याला एक जण येताना दिसतो तेव्हा,
दारूडा - अरे माझ्यासाठी एक टॅक्सी घेऊन ये.
व्यक्ती - ए कोण तू? मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा - मग कोण आहेस?
व्यक्ती - एअर कमांडर.
दारूडा - मग विमान घेऊन ये!
उशिराचे कारण ................
शिक्षक - काय रे बंड्या शाळेत यायला उशीर का?
बंड्या - बाऽऽई तेऽऽ
शिक्षक - ते ऽऽ ते काय?
बंड्या - मागच्या चौकात लिहिलं होतं, की "पुढे शाळा आहे हळू जा' म्हणून!
आजोबा तुम्हीच लपा.........
आजोबा - बंड्या लवकर लपून बस. आठवडाभर शाळेत गेला नाहीस म्हणून तुझे मास्तर
आलेत.
बंड्या - तुम्हीच लपून बसा. न येण्याचं कारण "आजोबा वारलेत,' असं मी
सांगितलंय.
लाडू.................
आई - अरे काल मी किचन ओट्यावर दोन लाडू झाकून ठेवले होते. कुठं गेले ते?
पप्पू - रागवतेस कशाला आई. रात्रीच्या अंधारात काल मला दुसरा लाडू सापडला
नाही.
*Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235*
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा