आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम आणि गुणकारी औषध म्हणजे तूप. तूप खाण्यामुळे आपली तब्बेत चांगली राहते आणि अनेक रोगांना तूप पळवून लावते. त्यामुळे आरोग्यवर्धक तूप खाणे केव्हाही चांगले.
आयुर्वेदात तुपाला औषधाचा दर्जा देण्यात आलाय. तूप हे सर्व रोगांवर गुणकारी आहे. तूप वात आणि पित्त नाशक आहे. तसेच झालेला कपही दूर करते. बाजात मिळणाऱ्या तुपापेक्षा घरात बनविलेले तूप केव्हाही चांगले. तुपामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतात.
- कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे. रोज आहारात वापरले जाणारे तूप औषधी आहे. जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी.
- घृत, अज्या, हवी, सर्पी, घी आदी नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे.
- तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.
- तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.
- तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.
- डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्या कपाळावर हलकेच मालीश करावे.
- शंभर वेळा धुतलेले तूप (शतधौत घृत) त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.
- तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.
- रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळे मूळव्याध बरा होतो.
Mr. Yogesh Madhukar Sawant.
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

I like it
उत्तर द्याहटवा