उदो बोला उदो, अंबाबाई माऊलीचा हो ।
उदो कारे गर्जती, काय महिमा वर्णू तिचा हो ।
उदो बोला उदो ॥ धृ॥
अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासून, घटस्थापना ती करूनी हो ।
मूलमंत्रजप करूनी, भोवते रक्षक ठेवोनी हो । ब्रम्हा विष्णू रूद्र, आईचे पूजन करती हो ॥१॥
उदो बोला उदो ….॥धृ॥
द्वितीयेचे दिवशी, मिळती चौसष्ट योगिनी हो । सकळांमध्ये श्रेष्ठ, परशुरामाची जननी हो ।
कस्तुरी मळवट, भांगी शेंदूर भरूनी हो । उदो कारे गर्जती, सकळ चामुंडा मिळुनी हो ॥२॥
उदो बोला उदो……. ॥ धृ ॥
तृतीयेचे दिवशी, अंबे श्रृंगार मांडिला हो । मळवट पातळ चोळी, कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीचे पदके कासे, पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती, अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ ३॥
उदो बोला उदो ……. ॥धृ॥
चतुर्थीचे दिवशी, विश्वव्यापक जननी हो,। उपासका पाहसी, अंबे प्रसन्न अंतकरणी हो ।
पूर्णकृपे तारिसी, जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊली, सुर ते येती लोटांगणी हो ।।४॥
उदो बोला उदो अंबाबाई…… ॥धृ॥
पंचमीचे दिवशी, व्रत ते उपांगललिता हो । अर्घ्य पाद्य पूजने, तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयी, करिती जागरण, हरिकथा हो । आनंदे प्रेम ते, आले सद्भावे क्रीडता हो ।।५॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥
षष्ठीचे दिवशी, भक्ता आनंद वर्तला हो । घेऊनी दिवट्या हस्ती, हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता, देसी हार मुक्ताफळा हो । जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।।६॥
उदो बोला उदो…… ॥धृ॥
सप्तमीचे दिवशी, सप्तश्रृंग गडावरी हो । तेथे तू नांदसी, भोवती पुष्पे नानापरी हो ।
जाई जुई शेवंती, पूजा रेखीयली बरवी हो । भक्त संकटी पडता, झेलूनी घेसी वरचे वरी हो ।।७॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥
अष्टमीचे दिवशी, अष्टभुजा नारायणी हो । सह्य्राद्री पर्वती, पाहिली उभी जगत् जननी हो ।
मन माझे मोहीले, शरण आलो तुजलागुनी हो । स्तनपान देऊनी, सुखी केले अंतःकरणी हो ।।८॥
उदो बोला उदो …….॥धृ॥
नवमीचे दिवशी, नव दिवसांचे पारणे हो । सप्तशती जप, होमहवने सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी, अर्पियली भोजनी हो । आचार्य ब्राह्मणा, तृप्त केले कृपेकरुनी हो ।।९॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥
दशमीचे दिवशी, अंबा निघे सिमोल्लंघनी हो । सिंहारूढ करी दारुण, शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो ।
शुंभ निशुंभादिक राक्षसा, किती मारिसी रणी हो । विप्रा रामदासा, आश्रय दिधला तव चरणी हो ।।१०॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥
आभार - मराठी ग्रिटींग्ज.नेट
MARATHI LOKANSATHI KHUPACH CHHAN SITE, AAHE (VERY GOOD SITE........)
उत्तर द्याहटवा