प्रेमाच्या कविता - चारोळ्या [Love lines - Poems - Charolya]

तुझ्या सहवासात असतांना
तुला एकटक न्याहाळतां ना
तुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना
तुझ्या सोबत जगायचे
राहूनच गेले
तू रागावशील, सोडून जाशील
मैत्रीचा धागा तोडून जाशील
माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे
राहूनच गेल..................

------------------------------------------------------------

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते, प्रश्न कधी कधी कळत
नाहीत आणि उत्तर चुकत जाते, सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, पण प्रत्येक
वेळी नवनवीन गाठ बनत जाते, दाखविनाऱ्याला वाट माहित नसते, चालणाऱ्याचे
ध्येय मात्र हरवून जाते, दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी,
"अनुभव" म्हणजे काय हे तेव्हाच कळते.

------------------------------------------------------------

झरे आणि डोळे यांना माहित असते फक्त वाहणे,
फरक एवढाच की,झरे वाहतात
तळ्याच्या साठवणीत, आणि डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत...

------------------------------------------------------------

एखाद्यावर मन लावण्यासाठी सुंदर असावं लागतं का ?
एखाद्यावर प्रेम करण्यासाठी श्रीमंत असावं लगातं का ?
त्याच्याकडे मन नसले तर चालत नाही, मैत्री करण्यासाठी नसाव लागतं श्रीमंत
आणि सुंदर,त्याच्याकडे असावं लागतो आपल्या मैत्रीचा आदर, मैत्री करणारे खूप भेटतील, परंतु निभवनारे कमी असतील
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात, कधी प्रेमाची हाक, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात...

------------------------------------------------------------

आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात, सूर्यापासून सूर्यापर्यंत अनेक
जन भेट्त्तात, खूप जन आपल्या जवळ येतात आणि दुरावतातहि... खूप जन
आपल्याला शब्द देतात आणि विसरतातहि , स्वताची सावलीही दूर जाते. शेवट आपण
एकटे असतो, सोबत असतात त्या फक्त
आठवणी ..........

------------------------------------------------------------

आयुष्य़ाची स्वप्ने पाहताना,
वास्तवाला विसरायच नसत,
गुलाबाला स्पर्श करताना,
काट्याच भान ठेवायच असत,
प्रितिच्या मोहात वावरताना,
...जपुन पाऊल टाकायच असते,
काळजाला झटका बसल्यावर,
कधीच रडायच नसत,
उध्वस्त झालेले विश्व आपल्,
शुन्यातुन उभ करायच असत.....!

------------------------------------------------------------

विसरणं शक्य नसलं तरी,
आठवण तुझी काढणार नाही.
भारावून जरी गेलो तरी,
नयनी आसवं दाटणार नाही.
...छळलंस किती तू मला तरी,
सवे तुज कोणी भांडणार नाही.
डोळ्यात उभे पाणी जरी,
थेंब एकही सांडणार नाही.

आग दु:खाची कोणत्याही,
अश्रूंच्या पाण्यानं विझत नाही.
तरीही दोन अश्रू पाझरल्याशि वाय,
मन मात्र हलकं होत नाही.

------------------------------------------------------------

दुख: व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात
जेंव्हा आपलेच जवळचे दुख: देवून जातात.
आठवणीचे क्षण मागे ठेवून जातात
संथ आशा सागरात लाटा उसळून येतात.
हास-या चेह-या वरती काळे ढग जमू लागतात
नकळत पापण्या ओल्या होवून जातात .

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

  1. मनमोहक! अगदी काळजाला भिडतील असेच

    उत्तर द्याहटवा
  2. ya kavita mla Khup Aavdalya
    Asyach sundar sunder kavita mala vacayalya far far aavadtat.
    thanking you,

    उत्तर द्याहटवा
  3. खुप छान आवडले मला .............. DJ-LOVE

    उत्तर द्याहटवा
  4. jabardast boss... super khup khup must. shbdac nahit mazakade.. -amol ban univ.nanded

    उत्तर द्याहटवा
  5. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  9. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  10. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  11. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  12. हृदयस्पर्शी कविता व चारोळी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा