औषधी मध [Medical use of Honey]

दृष्टीदोष
डोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणी
गळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी डोळ्यात नुसता मध
घालवा अगर सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा. यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे
होतात. दृष्टी फार लवकर सुधारते.

त्वचारोग
सारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा उत्पन्न
होतो. त्वचेची आग होते. अशा वेळी मध रोज घेणे हितकारक आहे. रोज वयोमानाप्रमाणे
१ ते २ तोळे मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. अंगकाठी सतेज होते.

श्वास खोकला
श्वासामुळे सारखा लागणारा दम, कफामुळे सारखा येणारा खोकला, खोकुन खोकुन पोटात
दुखु लागते. कंबर वाकते. एक प्रकारची तोंडावर सूज येते. सारखा कफ पडतो.
अशावेळी मध अगर त्रिफळा पूर्ण व मध एकत्र करुन घावे.

अतिसार
काही खाल्ले तरी वांती होणे. अशी सवय अनेकांना असते. म्हणून अन्न पचत नाही.
त्यामुळे भुक चांगली नसते. वांति होईल या भितीने अन्नद्वेष. त्यामुळे
निरूत्साह उत्पन्न होती. यावेळी मधाचा वापर अन्नात अवश्य करावा. त्यामुळे
वांती होण्याची प्रवृत्ती कमी होते.

कृमी
लहान बालके, मोठी माणसे कोणासही कृमी होण्याची प्रवृत्ती असते. त्यांच्या
शरीरात कृमींमुळे अन्नद्वेष उत्पन्न झालेला असतो. यावेळी मध घेत जावा.

गॅस
ज्या व्यक्तिंना गॅसेस होतात. अशी तक्रार असते. भूक लागत नाही, उत्साह नसतो.
काम करण्याची इच्छा नसते. कोणत्याही कामास कंटाळा येतो. नेहमी निरुत्साही
वाटे. अशांनी रोज लिंबू रस (एक लिंबाचा) व मध एकत्र करून ते मिश्रण रोज सकाळी
काही खाण्यापूर्वी घेत जावे.

कफ विकार
खोकल्याचा, दम्याचा त्रास ज्या व्यक्तीना होत असतो, त्यांनी मधाचा वापर आपल्या
आहारात सतत करावा. त्यामुळे कफाचा जोर कमी होतो व अंगात उत्साह येतो.

मध हा काही आजार असला, आपणास कोणत्यातरी गोष्टीपासून उपद्रव होत असला तरच
घ्यावा, असे नाही.

चांगल्या व्यक्तींनी सुध्दा मधाचा वापर करावा. कारण मध हा आयुष्यवर्धक व
वीर्यवर्धक आहे. त्यामुळे आरोग्यसंपन्न होण्यासठी तो शरीरास उपयोगी आहे.

पोटाच्या विकारांवर
रोज सकाळी एक पेलाभर थंड पाणी व चहाचे दोन चमचे मध एकत्र घेऊन चांगले एकजीव
करुन घेणे. त्यामुळे पोटाचे विकार बरे होतात . डोकेदुखी, हातापायास ठ्णका, संधिवात
यावर मध चांगले औषध आहे. भूकपण चांगली लागते. (लहान मुलास एक चमचा मध देणे.)

Mr. Yogesh Madhukar Sawant.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा