सुविचार

God's own country - Family flying kitesImage by Pandiyan via Flickr1) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
2) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
3) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
4) आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

5) मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा
मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
6) गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
7) आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
8) आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित
करु शकतो.

9) तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला
परमेश्वर दिसेल.
10) थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !
11) थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.
12) दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व
साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.
13) दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा