एक पत्र.. वर्ष २०७० मधून.. ए पी जे अब्दुल कलाम आझाद

Dr. A.P.J Abdul KalamImage by Tulane Public Relations via Flickr

मी नुकतच ५० पूर्ण केलय
भासतो मात्र ८५ चा
मला किडनीचा त्रास आहे
पाणी कमी पिण्यामुळे
वेळ नाही जास्त आता
माझ्यापाशी जगण्याचा
मी ५० पूर्ण केलय
सर्वात वयस्क व्यक्ती
मी या समाजाचा...

लहानपणी माझ्या
परिस्थिती वेगळी होती
हिरवळ होती पाऊस होता
भिजण्यातली मजा होती
आज सारं मी फक्त स्मरतो
कृत्रीम तेलाच्या टोवेल ने
अंग साफ करतो...

लहानपणी आयाबायांचे
सुंदर लांब केस असत..
कार धुण्यासाठी घरी
पाण्याचे पाईप असत
आता केसच नाही कुणाला
पाणीच नाही कुठे वापरायला
पोराच्या डोळ्यात ऐकून काळ जुना
जागा आहे फक्त मोठ्या आश्चर्याला..

आठवतं मला आज
"पाणी वाचवा"चे फलक असायचेत
लोक मात्र फलक म्हणून
फक्त वाचायचेत
आता नद्या तलाव
सारं काही सुकलं आहे
उरलं सुरलं असेल काही
दुषित होऊन बसलं आहे..

उद्योग धंदे संपले आहेत
वाढलीय बेरोजगारी
खा-या पाण्याला पिण्याजोगं
करण्याचीच सारी तयारी
तोच एक उद्योग आहे
कामगार आहेत "पाणी" पगारी

पाण्यासाठी सगळी कडे
दंगे सतत सुरू आहेत
आजचे दिवस खरच
खूप वेगळे आहेत
"दिवसाला ८ पेले"
आधी पाणी आवश्यक असे
आज फक्त अर्धा पेला
माझ्यासाठी उरला आहे...

कसा दिसतोय माणूस आज?
सुकलेला, सुरकुतलेला
अल्ट्रा व्हॉयलेट किरणांनी
पुरता पोळलेला
त्वचा क्षय, मुत्रपिंडाचे आजार
मृत्युच्या कारणांने ग्रासलेला...

पाण्याच्या अभावी
विशिचा तरुण चाळिसीचा दिसतो
कळलय न कारण
"पाण्याचा अभाव"
पण उपाय काहीच
आमच्याजवळ नसतो..
पाण्याचं उत्पादन अशक्य
झाडे नाही.. हवा दुषित
पुढची पिढी अशीच असणार
रापलेली, पोळलेली, त्रासित

आज श्वास घेण्यासाठी
हवा विकत घेतो आम्ही
"१३७मी क्युब"
हवा विकत घेतो आम्ही
जे घेऊ शकत नाही
कृत्रीम फुफ्फुसांबाहेर फेकल्या जातात
दुषित हवा घेत बिचारे
मरेस्तोवर जगत जातात

जिथे कुठे असेल पाणी
कडेकोट जपल्या जाते
पाउस पडलाच कधी
तर आम्लवृष्टी होते
विसाव्या शतकाचा
निष्काळजी पणा भोगतोय
बजावलं होतं न
वाचवा पाणी?
फळ आता आम्ही साहतोय

माझ्या बालपण ऐकताना
मुलगा माझा विचारतो
"कुठेय हो पाणी आता"?
मी फक्त आवंढा गिळतो...
दुखी होण्याव्यतिरिक्त
मी काही करू शकत नाही
मी देखिल कारणीभूत या सगळ्याला
मी ही त्याच पिढीचा अंश असतो

आता माझीच मुलं बाळं
माझी चुक भोगताहेत
फार फार मोठी किमंत
माझ्या चुकिची देताहेत
अशीच भोगत राहतील
कारण मागे जाणं शक्य नाही
पुढे पृथ्वीवर जगणं ही शक्य नाही

कसं तरी करून
मला मागे जायलाच हवं
माझ्या पुर्वजांना मला
मला कळकळीनं सांगायला हवं
"वाचवा हो पाणी, अहो वाचवायला हवं"
अजून वेळ गेली नाही
त्यांनी समजायला हवं

मूळ पत्र... एपीजे अब्दुल कलाम भाषांतर व काव्य रुपांतर मी केले आहे

मुन्ना बागुल
[ए पी जे अब्दुल कलाम यांच एक year 2070 प्रेझेंटेशन पाहिलं... खोलवर गदगदून आलं आणि जनजागृतीसाठी माझा उपयोग व्हावा म्हणून या year 2070 चं मराठी काव्य रुपांतर (स्वैर अनुवाद) करण्याचा प्रयत्न केला. २०७० मध्ये लिहिलेलं एक पत्र]

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या