प्रेमभावना

Nature Flowers 30Image by Christian Revival Network via Flickr

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देसील का?
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
नयनांच्या माझ्या पापण्यात
थोडा वेळ विसाव्शील का ?
माझ्या मनातील ......................

तुझ्या एका नजरे साठी
असतो सदा तुजपाठी
मज भरकटलेल्या जीवना मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील.................

एकच ध्येय माझ्या जगण्याचे
तुला माझी झालेली बघण्याचे
करण्या मज इच्छा पुरती तू पुढे येशील का?
माझ्या मनातील............

तुझ्यात असतो मी गंभीर
करतेस मज तू अधीर
शेवटचे मागणे हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

....कवी: म.श.भारशंकर
09725338578

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा