निरोप

Bye!Image by OMG! Zombies! via Flickr

काळाच्या या नाजुक गाठी
दातांनीही सुटतिल ना
हळूच उमलती पंख हे कोमल
दो हातांनि मिटतिल ना ॥

काळ बसला मारित गाठी
मिटुनि डोळे लावुनि मन
वैशाख वणवा अलगद पेटे
कातरस्मृतींचे जळते वन ॥

कालाचे हे चाक दातेरी
ना कधीही मागे फिरे
कोण चिरडते पदी तयाच्या
कोण उरे आणि कोण मरे ॥

प्रसन्नतेचा झरा खळाळे
ओसंडुनि हे गात्र न् गात्र
निरोप देतो तुजला आता
भरूनि गेले घटिका पात्र ॥

...............................................

ही कविता जानेवारी २००४ ला धुले येथील मेडिकल कॉलेजला अडमित होतो माझ्या हातचे ऑपरेशन झाले होते मी मरण्याच्या दारातून परतलो हाहै त्या कॉलेजमधे मी ही कविता तयार केली. हॉस्पिटल मधे मी व माझी आई आणि वडिल ३ महीने होतो त्यांनी ही कविता वाचली तर त्यांच्या डोळ्यात पानी आले.
- मुन्ना बागुल

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा