Image by Miriam Cardoso de Souza - " BIENAL PB CXS SUL/2010 via Flickr
फुलांचे फुलणे झाले बंद?वसंत ऋतुचे सजणे झाले बंद?...
कसा चंद्रही अंधाराने व्याकुळ?
आज चांदणे पडणे झाले बंद!...
श्रावणातला पाउस येतो-जातो;
पावसातले भिजणे झाले बंद!...
वाट कुणाची कोणी पाहत नाही;
डोळे लावुन बसणे झाले बंद!...
डोळ्यांमध्ये येतच नाही पाणी
रडणे आणिक हसणे झाले बंद!...
शहरामध्ये अमाप गर्दी झाली;
मनुष्य तरिही दिसणे झाले बंद!...
जमती अड्डे मित्रांचे पण माझे-
तिथले उठणे-बसणे झाले बंद!...
स्वतःशीच मी हितगुज करतो आता
कुणास काही म्हणणे झाले बंद!...
'अजब' मनाला सुचेल ते-ते लिहितो;
'कोणासाठी' लिहिणे झाले बंद!...
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
tumachya kavita khup chhan ani sundar aahet
उत्तर द्याहटवाrajesh pawar