कविता बनवता बनवता

the beautyImage by dhyanji via Flickr

दिवस भुर्रकन सरून गेले
हातात गजग्यांच्या जागी
शब्द आले…
तसेच खुळखुळ करीत
दान मागत राहिलो…कवितेचे
मध्यमवर्गीय अनुभवांचे
गुळगुळीत कागदावर,पार्करच्या पेनने
कविता बनवता बनवता
कोरडे झालेले पेन आणि मन
चाचपडत राहिले…मॄगजळाला

आणि अशातच
तू दिसलीस
मनभावनी, सोलासावनी, मॄगनयनी
सौंदर्याची खाण ..आरस्पानी

हरवून गेलो एकदा
तुझ्या निळ्याशार टपो-या डोळ्यांत
आणि मग हरवत गेलो सदा
तुझ्या गालावरच्या खळ्यांत

आणि असं बेधूंद बेहोश
होतांना
डोळ्यांतल्या विभ्रमावर
लुब्ध होतांना
वार्याशी खेळणा-या बटांना
सावरतांना

जाणवले मला
आणि मग कुठूनशी आलेली
ती छानशी कविता लिहून काढली..

हे हे कागद पेन नसतानाही

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा