Image by rebeccamissing via Flickr
कसे न तेव्हा कळ्ले काहीकी तो होता आवच सार
अनुभुतीच्या आधाराविण
पोकळ नुसता शब्दपसारा !
नव्हती झाडे, नव्हत्या फांद्या
मातीमधली मुळेहि नव्हती,
तरारलेल्या ताठ तुर्यांचा
डौल तेवढा होता वरती !
अभाव होता भावशुन्य तो
आत कुणीही नव्हते जागे
नसत्यावरती असत्याचे ते
विणले होते झगमग धागे !
भयाण होते आत रितेपण
आणि अहेतुक होते हेतू,
झिरपत होती अहंभावना
शब्दांशब्दांमधुन परंतु !
मिरवणूक ती वाजतगाजत
गेली जेव्हा दारावरूनी
बघत राहिले, एक हुंदका
असेल कोठे यात इमानी ?
- शांता ज. शेळके
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
शैली अतिशय छान आहे, महेश
उत्तर द्याहटवा