तुझ्या आठवणीसाठी....

Gulmohar - on the occasion of 2 marriages.Image by freebird (bobinson|ബോബിന്‍സണ്) via Flickr

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द
पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही
तुला कसेसे होईल...
पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना
तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत
दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या
छातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.

एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी
साडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले
तेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारखं तू
म्हणाला होतास,
"आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा ? "
हे सारे उद्याही तसेच असेल.......

ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील
संधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात अवघा आसमंत
न्हाउन निघेल....
आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा
कण न् कण पुळकीत होउन नाचू लागेल
हे सारे तसेच असेल...

फक्त तू नसशील.........तू नसशील
मात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेची
लालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील.

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

  1. मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६ जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा