मित्रा चल जरा फिरून येवू

night drivingImage by fittzer via Flickr

कशी झाली गाठ - भेट, आले दोघे पाठोपाठ... कुठेतरी कसेतरी जायचे ना?
तुझी गाडी, माझी गाडी.. चढवू अन दोन भाडी.... बुंगाट गाडी पलवू ना..... पलवू ना!

चाले रस्ता, धावे रस्ता पण जरा घे आहिस्ता मागच्याची फटफटी फुटे,
ट्रक गेला, गाडी गेली ओवरटेक सारी झाली आता ब्रेक कर थोडे पुढे,
गाव गेले मागे थोडे, रस्ता सुनासुना पडे.... वारे गार अंगास झोंबते ना...
झोंबते ना!! १!!

क्षण आहे लय भारी, आता जरा घे भरारी... तारुंण्याचे रक्त सळसळे,
लक्ष्य ठेव थोडे पुढे, मागे लयी झाक भाडे... यौवनाचे नको करू चाळे,
सोसाट्याच्या वारयामंदे, नको करू असे धंदे... उगाच ब्रेक नको माऽऽरू ना...
माऽऽरू ना!! २!!

खाणे झाले, बिडी झाली चहा होता लय भारी... पोचलो रे तिथे कसे बसे,
कधी झाली पायपिट, कधी झाली कटकट... कधी कधी बेत हा फसे,
हातामध्ये हात दोन, तुझे माझे संभाषण.... सख्या म्हणे आता घरी जायचे ना...
जायचे ना!! ३!!

तिचा माझा स्पर्ष झाला, गोड गोड तो अबोला.... क्षण कसे गेले ना कळे,
असे करू तसे करू, घरभर उगी फिरू.... माझे मला ना काही कळे,
झालो पुरा वेडाभान, मग झाले फोनाफोन.. पुन्हा कधी जायचे ते ठरलय ना... ठरलय ना?!!
४!!

ई-मेल फॉरवर्ड - आभार - कवी

टिप्पण्या