Image via Wikipedia
आता जगायचे असे माझे किती क्षण राहिलेमाझ्य धुळीचे शेवटी, येथे किती कण राहिले
हृदयात विझला चंद्रमा नयनी न उरल्या तारका
नाही म्हणायाला तुझे, हे आपुलेपण राहिले
होता न साधा एव्हढा जो शब्द मे तुजला दिला
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण राहिले
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबून पाहतो, मागे किती जण राहिले
ई-मेल फॉरवर्ड - आभार - कवी
khupach changlya kavita ahet.
उत्तर द्याहटवाdipak nadkar
Atttyanand!
उत्तर द्याहटवा