Image by Vincent Montibus In&Out via Flickr
तू असल्यावरी जवळ माझ्या;मी माझा न राहतो;
जगण्याची कविता माझ्या;
मी नव्याने मांडतो.
तुझं वागणं तुझं बोलणं;
मला माझ्यासाठीच वाटतं;
तुझ्या प्रत्येक कृतीचा अर्थ;
माझं मन स्वतःशीच लावत.
प्रेमात पडल्यावर सुरू होतं;
मन आणि बुद्धीचं द्वंद्व;
मन म्हणत ति तुझीच आहे;
तर बुद्धी म्हणते वास्तवात ये.
मन आपलं निष्पाप असतं;
फुलापेक्षाही नाजुक असतं;
अन् लहान बाळापेक्षाही;
जरा जास्तच हट्टी असतं.
ती माझीच आहे या भ्रमात;
आयुष्याची पान उलटून जातात;
मनाच्या भराऱ्या बुद्धीच्या वास्तवाशी;
जुळायला लागतात.
तेवढ्या वेळात पुलाखालून;
बरंच पाणी वाहून जात;
मन मात्र स्वतःच्याच दुःखात;
स्वतःला गुरफटून घेतं.
ई-मेल फॉरवर्ड - आभार - कवी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा