महाराष्ट्र अस्मिता फडकली..

"Shivaji and his army" by M. V.Image via Wikipedia

ऊत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी
एकदिलाने उमटुदे जयघोष आज हा ओठी
दरीखोरयातुन नाद घुमूदे एकच दिनराती

शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली
संतांच्या अमॄतवाणीने जीवन केले गौरवशाली
ॠषीमुनी आणि घोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले
आदर्शाचे अमोल लेणे ह्या भूमीला देऊन गेले
भक्त्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी
गणाधीश नाचतो रंगुनी नवरात्रीची अंबाभवानी
मनगटात यश आहे आमच्या आणि किर्ती ललाटी
येळकोटाचा भंडारा उधळी खंडॊबाची आण घेऊनी
वारकरयांची सुरेल दिंडी विठुरायाचे नाम गर्जते
समॄद्धीची पावन गंगा भरुन येथे नित्य वाहते
मनगटात यश आहे आमच्या आणि किर्ती ललाटी ...

अभंग ओवी फटका गवळण धुंद पवाडा धुंद लावणी
मायमराठी भाषा अमुची नक्षीदार भरजरी पैठणी
ग्यान कला भक्ती विद्येचे वैभव येथे सदा नांदते
जे जे अनुपम अभिनवआहे ते ते सारे येथे घडते
जिंकू आम्ही आव्हानांना देऊन आव्हाने मोठी

घोर संकटे झेलून घेतील आमचे अजिंक्य बाहु
काळाशी ही झुंज देऊन सदैव विजयी राहू
जरी रांगडा बाणा आमचा जीवास जीव देऊ
अंगावर कोणी आले शिंगावरती घेऊ


इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या