Image via Wikipedia
आश्चर्य काय तीही आनंदली असावीमाझ्या कलेवराची ती सावली असावी
आघात लेखणीचा कमजोर का पडावा?
छापून आसवांना ती गंजली असावी
दिसते सभोवती का सारेच लाल रंगी
दृष्टीच आज माझी रक्ताळली असावी
माझ्या तुझ्या कथेचा उडलाय बोजवारा
पात्रे कथानकाला कंटाळली असावी
जगणे चवी चवीचे का वाटते नकोसे?
माझीच भूक थोडी मंदावली असावी
शिलगावले कितीदा पण पेटलोच नाही
काडीच ह्या जगाची सर्दावली असावी
बघतेय वाट ती ही आता उजाडण्याची
म्हणुनी निशा जराशी रेंगाळली असावी
हृदयी असूनही ती, अश्रूंत मी बुडालो
हृदयी तिने त्सुनामी सांभाळली असावी
.......... इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा