Image by Ric e Ette via Flickr
उन्हाने वाफ व्हावा थेंब पाण्याचा, तसा झालाकसाही का असो अवतार माझाही बरा झाला
हयातीला मजा आली, हयातीची मजा आली
तिलाही फायदा झाला, मलाही फायदा झाला
जिथे जाईन मी तेथे मला मी नेमका भेटे
स्मशानी मात्र योगायोग थोडा वेगळा झाला
अशीही माणसे होती, तशीही माणसे होती
मला जो भेटला तो शेवटी माझ्यातला झाला
तिलाही वाटले 'आता' मला वाटायचे जे जे
चला; तो राहिलेला एकसुद्धा आपला झाला
उधारी मागण्यासाठी हजारो माणसे आली
कुणी फेडायला मागे नसे हा फायदा झाला
तुपाची धार कोणी घातल्याने धूरसा झाला
तिचेही नाव कोणी काढले अन जाळसा झाला
कसे झाले, कसे झाले, जगाला केवढ्या शंका!
कधीही पाहिला नाही असाही बोलता झाला
'कसा आहेस मुन्ना ? जाळल्यानंतर कसे आहे?'
कुणी बोलायला होते कुठे? बस दाखला झाला..!
इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा