मराठी सुविचार,

pétales de rose en joieImage by gelinh via Flickr

  • सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  • "तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार - श्री. वामनराव पै.
  • आधी विचार करा, मग कृती करा.
  • स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......
  • कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते
  • आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!
  • शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!
  • निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......
  • ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर
  • जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो
  • मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
  • आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
  • एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
  • तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
  • सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
  • सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.



  • ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
  • ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
  • देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
  • कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी
  • रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
  • नियमितपाना हा माणसाचा मित्र, तर आलस हा त्याचा कट्टर शत्रू आसतो.
  • भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले.
  • प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.
  • तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
  • मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
  • आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
  • परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी!
  • भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
  • संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
  • तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
  • ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
  • स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
  • अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
  • तुलना करावी पण अवहेलना करू नये.
  • समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
  • आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
  • मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
  • चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
  • व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
  • आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
  • तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  • अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे
  • कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर अपयश पचविण्यास शिका.
  • स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी मनुष्य इतरांच्या त्रुटींकडे लक्ष वेधतो.
  • मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
  • आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
  • दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
  • आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.
  • मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा
  • मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
  • नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं. मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती.
  • जेव्हा तुम्ही सर्वस्व ओतून मनस्वीपने प्रयत्न करता, कर्म करता, तेव्हा कर्म हिच तृप्ती होते. म्हणुन आनंदी आयुष्यासाठी एक सोपं तत्व निवडा, ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो, तेच क्षेत्र निवडा, स्वत:च्या आवडीचे काम निवडा.
  • समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.
  • या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.
  • महापुरुषांची चरित्रे आणि आत्मचरित्रे ज्यांच्याशी बोलतात त्यांना स्वतंत्र चरित्र प्राप्त होते.
  • अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.
  • अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
  • माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.
  • गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
  • यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
  • आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
  • आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
  • तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.
  • थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !
  • थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.
  • दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.
  • दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.
  • दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.
  • दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत: उन्हात उभं राहावं लागतं.
  • दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.
  • दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.
  • ध्येयाचा ध्यास लागला; म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
  • नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
  • नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही.
  • नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो.
  • प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.
  • पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो, तो आपोआप जिरू द्यावा लागतो.
  • कलेची पारंबी माणसाला बळ देते.
  • फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.
  • बुद्धीमत्तेपेक्षा चारित्र्य श्रेष्ठ आहे.
  • काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.
  • मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
  • मुलांच्यात बदल हाच शिक्षकाचा आनंदाचा ठेवा !
  • माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.
  • माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.
  • माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.
इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा