चाललंय नेहमीचं ...!

Read Me Like an Open BookImage by pupski via Flickr

चाललंय नेहमीचं
नेहमीचंच चाललंय
शोधायचाय मार्ग, मला मिळवायचाय
दिवस आले गेले
मी पर्वा केली नाही पण
शोधायचाय मार्ग,मला मिळवायचाय

जर तुम्ही
वाचले तुमचे मन...
लागेल काही वेळ
समजण्यास सर्व
पण तुम्हाला, तुमच्या मनाचा
कळेल अर्थ
आणि तुमचे मनच
तुम्हाला ठेवेल वर
जेंव्हा सर्व खाली...
केवळ वळवा मानऽ

काहीच न करण्यापेक्षा
काही केलेलं बरं.
असं ऎकलंय मी, मी ऎकलंय...
सर्व शक्य आहे
मी नेहमीच जाणत आलोय पण...
शोधायचाय मार्ग, मला मिळवायचाय

जर तुम्ही
वाचले तुमचे मन...
लागेल काही वेळ
समजण्यास सर्वऽ
पण तुम्हाला, तुमच्या मनाचा
कळेल अर्थ
आणि... जेंव्हा तुम्ही वाचाल
त्या पुस्तकाचे, शेवटचे
कोरे पान...(येईल तुम्हाला भान)
केवळ वळवा मानऽ
(आणि आपल्या मनात बघा)

... रोहन जगताप
......................... इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या