Image by "" En el Pais de
los sueños "" by Marc_ via Flickr
तू मला उगाच पानगळीची कारणं सांगू नकोस
माला चांगल ठावूक आहे
झाड़ांच आकालीही फूलणं अन बहरणं....
.......................................................................
आशचर्य वाटत कधीकधी तुझ्या बेरजेच्या समीकरणांच
पानगळीत नको ते झटकून झाड़ आपल अस्तित्व टिकवत असतात....
तुझ आपल अजबच आहे ....वार्यालाच दोष देत राहतेस .......................................................................
तुझ ठीक आहे ग ....
तू पानगळ तठ्स्थतेने पाहतेस.....
माला फ़क्त चिंता आहे ती तुझ्या गजर्याची !!!!....
.......................................................................
मी एखादी नवीन कविता करावी ...
तुझा कधीचा आग्रह .....
माझ्या मुक्या वेदनांना तुझा उघड काटशह ....!!!
.......................................................................
तू निरोपादाखल दिलेल फूल
आजही माझ्या कवितांच्या वहीत
आपल अस्तित्व विसरून बसलय
अव्यक्ताला अधोरेखीत करीत अन ...
माझ्या कवितांठी उसना वसंत फूलवीत..
कुठल्या शब्दांनी सांत्वन कराव स्वताच अशावेळी...
पापण्यांतला चंदेरी बहर असाच भीजत राहतो अशावेळी ....
........................................... गिरीश कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा