पहिल प्रेम म्हणजे,

Give to Humanity... (repost)Image by ~Aphrodite via Flickr

पहिल प्रेम म्हणजे,
जश्या पहिल्या हळुवार पावसाच्या सरया
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन मातीतला सुगंध खुलुन यावा........

पहिल प्रेम म्हणजे,
जश्या अलगत पडणार-या गारा
शांत भरभरून होणारा वर्षाव
अन स्पर्श होताच गरवा देणारा.....


पहिल पेम म्हणजे,
डोलत लवलवनारी नाजुक कळी
फुलुन आली की
हव हवस वाटणारया फुला सारख.....

पहिल प्रेम म्हणजे,
वेगाने वाहणारया लाटा
अन किनारा भेटताच
पाण्या सोबत शांत जाणारे वालु.....

पहिल प्रेम म्हणजे,
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा
वेडसर माणुस घडवनार......

पहिल प्रेम म्हणजे,
जागेपणी स्वप्न पाहणारे डोळे
स्वप्न तुटताच
आश्रूना संभालाणारया पापण्या.....

टिप: खरच असाच असत पहिल प्रेम म्हणजे
कवीता निट वाचा आणि अनुभवा पहिल प्रेम
तरच समजेल कवितेच साराश


...................रोहित कोरगांवकर[rohit9star[@]gmail.com]

टिप्पण्या