Image via Wikipedia
नाते कसे असावे???प्रश्न तर कठिण आहे....
पण जे कठिण आहे....
त्यालाच तर आपण आधी संपवतो
मग याचे असे का?
का ते लांबचे चंद्र सूर्य जवळचे वाटतात?
कधी चॊथ्या सीटवरचा म्हातारा जवळचा वाटला का...
तेव्हा'भावनांचे नात'नाही का आठवत..
अठराव्या वर्षी मत देतांना भ्रष्टाचाराचा राग आला होता...
पण पासपोर्ट काढतांना तो का गिळून र्निलज्य झालात..
तेव्हा अठरा वर्ष शिकलेलं'तात्विक नातं'नाही का आठवलं..
लहानपणी शाळेत केली होती झाडलोट मनापासून..
पण आता भर रस्त्यात थुंकतांना नाही का लाज वाटत
तेव्हा वर्गमित्रांसोबत घालवलेलं'स्वछतेचं नातं'नाही का आठवत...
म्हटलं तर सगळं सोप्प आहे अनुभवला तर स्वर्ग आहे...
म्हणूनच हल्ली मला नातंच पटत नाही..
आपल्याच घरी कोंबडी पाळूनतिचं मटण खाणं पटत नाही..
तरीही मित्रांनो,
प्रश्न मात्र तसाच राहतो
नाते कसे असावे???
नाते असावे प्रेतासारखे
वाटेत फुलं पसरत जाणारे...
नाते असावे फुलासारखे
तोडल्यावरही तीन दिवस आपल्याला हसवणारे...
आणि नाते असावे वाळवंटासारखे
दिवसा वेगळे आणि रात्री वेगळे वागवणारे...
---संदिप उभळ्कर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा