Image by Midnight-digital via Flickr
1. अस्तित्वस्वप्नांच्या ताठा(टा)त माहीत नाही काय आहे
पहाटेला प्रखराचा निर्सगाचाच शाप आहे
संध्या जरी काळोखात बुडली तरी
खरयाखुरया अस्तित्वाला त्याचीच प्रबळ साथ आहे
2. शाप
जगणे हा एक शाप आहे
मरण्याआधीचा व्याप आहे
भावनांच्या गुंतागुंतीत जिथे
पहिला आणि शेवटचा श्वास माफ आहे
3. निमित्त
आयुष्याच्या सुरवातीलाच
मी आज निकामी ठरलो
साला बाम्ब(bomb)येऊन अंगणात पडला
आणि मी मात्र निमित्त ठरलो
---संदिप उभळ्कर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा