कसोटीची 'टेस्ट' [20-20 Cricket Series - Marathi Poem]

Geoffrey Boycott battingImage via Wikipedia

कसोटीची 'टेस्ट' पहायला
आता कुणी धजलं कसं?
पांढ-या पाढ-या कपड्यांमध्ये
'चिअर्स' साठी सजलं कसं?

ट्वेंटी-२० च्या खेळात
विक्रमांचा इतिहास घडत आहे.
षटकारांची बरसात पाहुन
कसोटी मैदान रडत आहे.

दमदार खेळाडुंचा आवाज
आता कमी होईल
ज्याच्या त्याच्या कानांवर
'युवराज' नावाचा 'ध्वनी' होईल


ट्वेंटी-२० चा खेळ आता
सट्टेबाजार ठरतो आहे.
तीन - तीन दिवस खेळणाराची
किंमत कोण करतो आहे?

म्हणे वन-डे साठीही एक दिवस
'वेस्ट' कशाला घालवायचा,
तीन तासाचा शो च आता
डे-नाईट चालवायचा.

ट्वेंटी-२० च्या बाळानं
चांगलच बाळसं धरलं आहे
कसोटीचं आयुष्य आता
नावापुरतच उरलं आहे.

कसोटीची 'टेस्ट' आता
पार फिकि पडली आहे
वन-डे नंतर ट्वेंटी-२० ने
पुन्हा कंबर मोडली आहे.

................................... र. ल. ठोंबरे. औरंगाबाद.
rlthombre[@]gmail.com
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या