जळलेला मोहोर

Moon against the Belt of VenusImage via Wikipediaतरुण स्त्री पुरुषांनी प्रेमजीवनात शरीरसुखाचा भाग अतिशय महत्त्वाचा मानला पाहिजे. परस्पराच्या आनंदसंवर्धानाकरता आपण एकमेकांचे हात हातात घेतले आहेत याचा त्यांनी कधीही विसर पडु देऊ नये.

आयुष्याच्या प्रवासातली खरुखरी मौज असल्या सोबतीतच आहे, इत्यादि गोष्टी सांगितल्या जात असल्या तरी केवळ कामतृप्ती हे संसाराचे कधीच ध्येय होऊ शकत नाही.

आकाशातल्या चंद्राला हात लावण्याच्या धडपडीत माणसाच्या पृथ्वीवरले पाय सुटले तर तो तोंड्घाशी पडतो. तो चंद्र योग्य वेळी अनेकांच्या हाती लागतो; नाही, असे नाही; पण त्याचा लाभ संसाराच्या सुरुवातीला होत नाही. दहा वीस वर्षे संकटे आणि सुखे यांची चव जोडीनेच घेतल्यावरच त्या चांदण्याची वृष्टी होऊ लागते. त्या दृष्टीने उदात्त प्रीति हा शुक्ल पक्षातला चंद्र नाही; तो वद्य पक्षातला आहे.

................................................................................................. वि. स. खांडेकर.
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या