Image via Wikipedia
खुशीने मन माझं
इथं तिथं धावलं
रेतीत उमटवत त्याची
इवली इवली पावलं ..!
समुद्राचं पाणी
अचानकच कावलं,
वाहुन नेली त्याने
माझ्या मनाची ती पावलं ..!
वेड्या माझ्या मनाचं
त्यात सुद्धा फावलं,
दोन घटकेच्या खुशीत
त्याचं इटुकलं काळीज पावलं ..!!
................... चक्रवर्ती
Good one.. really loved.
उत्तर द्याहटवाkhu8pach chan mitra