Show/ Hide Image Version! [+ / -]
- सगळे कागद सारखेच... त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते..!
- रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसुनओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.
- ड्रिंक्स घेतल्यावर न घेतलेल्या माणसापेक्षा जागरुक राहावं लागतं.
- आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.
- सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही
- कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपुर्वाई आहे.
- रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगु शकतो, पण तुळस वॄंदावनात राहते. तिच्यापुढं आपल्यालाच उभंरहावं लागतं.
- आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं - आपला उत्कर्ष होतोय.
- ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्यांचाच नसण्याची पोकळी जाणवते.
- अत्तराची बाटली संपतानाच जपायची असते.
- दु:ख पराभवाचं नसतं। फसवणुक करुन पराभव गळयात मारला जातो, त्याचं दु:ख होतं. कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं वाईट वाटतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा