- सरड्याची धाव कुंपणापर्यंत.
- सळो की पळो केले.
- साखरेचे खाणार द्याला देव देणार.
- साठी बुध्दी नाठी.
- साडी नेली बायनं नि चिंधी नेली गायनं.
- सात सुगरणी, भाजी अळणी.
- साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.
- साता समुद्राकडे राजाने लावला भात, ऐक ऐक शीत नऊ नऊ हात.
- साधली तर शिकार नाही तर भिकार.
- साधी राहणी अनं उच्च विचार सरणी.
- साध्वा जाते विधवेपाशी आशिर्वाद मागायला, ती म्हणते माझ्यासारखीच हो!
- साप मुंगसाचे वैर.
- साप म्हणू नये आपला, नवरा म्हणू नये आपला.
- सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.
- सासू न सासरा जांच करे तिसरा.
- सासू नाही घरी, नणंद जाच करी.
- सासू मेली ठीक झाले, घरदार हाती आले.
- सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.
- सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.
- सुंठेवाचून खोकला गेला.
- सुईण आहे, तो पर्यंत बाळंत होऊन घ्यावे.
- सुख राई एवढे दु:ख पर्वता एवढे.
- सुगंध पसरावयाचा असेल तर चंदनाला झिजावे लागते.
- सुतावरून स्वर्ग गाठायचा.
- सुसरबाई, तुझी पाठ मऊ.
- सोन्याची सुरी असली म्हणून काय उरात खुपसुन घ्यायची.
- सोन्याहून पिवळे.
- स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
- स्वत:ची सावली विकून खाणारी माणसं.
- स्वभावाला औषध नाही.
- स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
- हगत्या लाज की बघत्या लाज?
- हजाराचा बसे घरी, दमडीचा येरझाऱ्या घाली.
- हजीर तो वजीर.
- हत्ती गेला अऩ शेपुट राहिले.
- हत्ती पोसवतो पण लेक नाही पोसवत.
- हत्तीवर अंबारी जाते कुत्री भुंकत राहतात.
- हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
- हसणाऱ्याचे दांत दिसतात.
- हा सुर्य अऩ हा जयद्रथ.
- हागणाऱ्याला लाज नाही पण भागणाऱ्याला आहे.
- हात दाखवून अवलक्षण.
- हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.
- हातचं (गणित) ठेवून वागावे.
- हातचे सोडून पळत्याच्या मागे.
- हातच्या काकणाला आरसा कशाला?
- हाताची पाचही बोटे कधीही सारखी नसतात.
- हातात कवडी विद्या दवडी.
- हातानं होईना काही तोंड घेतं घाई.
- हाती घ्याल ते तडीस न्या.
- हाती नाही अडका, बाजारात धडका.
- हाती नाही आणा, मला कारभारी म्हणा.
- हिंग गेला, वास राहीला.
- ही काळ्या दगडावरची रेघ.
- हे बालाजी, छप्पन्न कोटींचा चतुर्थांश.
- होता जिवा म्हणून वाचला शिवा.
- हौसेनं केला पति, त्याला भरली रक्तपीती.
आभार - PVRSSPR
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा