इतरत्र...!आपले मत!
मी मराठी वर काय - काय शोधाल?

 

साधं सोपं आयुष्य..... [Marathi Kavita]

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!



मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो
जेव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं.........

कवी : प्रसाद शिरगांवकर


......................... आभार - आशु पाटील

पुढे वाचा...


कधी कधी अदिती ....

Unknown rose colored rose family flower, Julia...Image by Martin LaBar (going on hiatus) via Flickr

कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं
अशात कुणी कसे रोखावे आसवांचे झोके
अन कसे कुणी म्हणावे , Everythings gonna be ok ..

कधी कधी वाटतं, जगण्यात नाही उरली काहीच मजा
कधी कधी वाटतं, दिवसातला प्रत्येक क्षण एक सजा
अशा हदयात कसे पडावे हास्याचे ठोके
अन कसे कुणी म्हणावे , Everythings gonna be ok ..



करतात बघ तुजवर किती प्रेम सगळे
रडतो आम्हीही जर तुझे आसू वाहिले
गाणं येत नाही तरी आम्ही गाऊन पाहिले
अदिती , मानलं जग कधी अंधारलेलं वाटतं
पण रात्रीनंतरच नाही का हे आभाळ उजाडतं....

कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं
अदिती , हस ना हस ना हस ना हस ना हस ना तू अता
नाही तर बन ना थोडी थोडी थोडी थोडी थोडीश्शी स्मिता....

तू खुश आहेस तर बघ जग सुंदर दिसतं
सूर्य ढगातून येउन जगात जगणं पसरवतो
ऐक बेभान वारा तुला येउन काय सांगतो
की अदिती, दूर गेलेले परत एकदा भेटतात
अदिती तू बघ , ही फ़ुलं नक्की परत फ़ुलतात...

कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं
अदिती , हस ना हस ना हस ना हस ना हस ना तू...!

.................................. स्वप्निल [ई-मेल]
Reblog this post [with Zemanta]

पुढे वाचा...


Grab this Widget ~ Blogger Accessories