एक एक आठवण चाळून घे... [Marathi Poem]

A hug from KipperImage via Wikipedia

नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे


आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.

........................................ स्वप्निल
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

  1. Exlent Poem but in my computer marathi founds not available so very sorry i cant replay i in marathi

    उत्तर द्याहटवा
  2. मनस्कार जितु,
    मी मराठीला भेट दिल्याबद्दल आभार!

    मराठी टायपिंगसाठी गमभन = http://www.gamabhana.com/gamabhana_ex/ या वेबसाइटचा वापर करा!

    आभार,
    गुरु.

    उत्तर द्याहटवा
  3. can somebody please let me know if you have the poem "tu asach var ja" by kusumagraj? It had appeared in some diwali ank.

    उत्तर द्याहटवा
  4. Atishay uttam blog aahe. Khupach chaan kavita aani dusre stuff ati sundar aahet.

    Anand

    उत्तर द्याहटवा
  5. i like "tujhi aathvan chalun ghe".
    Mast kavita aahe.manala sparsh karanari.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा