धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावतात गंध, पुष्प आणि अक्षतांनी पूजा करून त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करतात.
'मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह। त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।' त्यानंतर ते सर्व दिवे इतरत्र लावतात त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवतात . अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे.
यमराज पूजनया दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावाव्या. घरातील स्त्रियानी रात्री दिव्यात तेल टाकून चार बत्त्या लावाव्या पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करावी. यालाच यमराज पूजन म्हणतात.
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाVery informative
उत्तर द्याहटवा