मी मराठी

आयुष्य जास्त सुंदर वाटत....!! [ Marathi Kavita ]

Beautiful Spring Flowers
Beautiful Spring Flowers (Photo credit: www.ForestWander.com)
"चांगली वस्तु",
"चांगली व्यक्ती" व
"चांगले दिवस"
यांची किंमत" निघुन गेल्यावर समजते...
"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव"
ज्याच्याजवळ आहे...
तोच खरा "श्रीमंत".

चार चौघात बसण्यापेक्षा,
कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....!!

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

३१ टिप्पण्या:

 1. गगन भरारी घेण्याऐवढे सोपे नसते आयुष्य,,,,,,

  उत्तर द्याहटवा
 2. Ayush kharach anmol ahe. Jyanha kalal te vaet prasangi sudhha jivnach son kartat

  उत्तर द्याहटवा
 3. भव्य विचार आहेत, आवडले. लिहीणे चालू ठेवा.

  उत्तर द्याहटवा
 4. भव्य विचार आहेत. आवडले. सिहीणे चालू ठेवा.

  उत्तर द्याहटवा
 5. ♡ ♡♡रातराणी♡♡♡

  होताच तिन्ही सांज मला तुझी याद येते,
  डोळ्यात माझ्या माझ्याच नकळत पाणी जमा होते,
  पाहीन जिथे तिथे मला फक्त तुच तु दिसतेस,
  स्वप्नांत माझ्या होऊन परी तु मग निजतेस,
  चंद्रासाठी असमंतात जशी खुलावी चांदणी,
  चंदेरी राती स्वप्नात माझ्या, तु ये "रातराणी"||1||

  चाहूल पुन्हा तुझी माझ्या कानावर पडावी,
  असुसलेल्या जीवाला भेट जीवाची घडावी,
  तुझ्यासाठी मन माझे हे झुरते आहे,
  विसरून भान जगाचे, तुझ्यावर मरते आहे,
  मेघांच्या भेटीसाठी जशी आतुर सारी धरणी,
  चंदेरी राती स्वप्नात माझ्या, तु ये "रातराणी"||2||

  वारयातला लहर बघ कसा मंद धुंद गं झाला,
  तुझ्या sparshachi आठवण देऊन, वेड लावून गेला,
  देहामध्ये माझ्या आज नशा चढते आहे,
  अंतरंगी प्रितीची मधूर बासरी वाजते आहे,
  तुझ्यासाठी बेभान मी, तु माझी गं साजणी,
  चंदेरी राती स्वप्नात माझ्या, तु ये "रातराणी"||3||

  गोरया तुझ्या देहावरची कांती, मला किती किती छळते,
  तुझी आठवण ठेऊन मनी रात्र सारी सरते,
  झाडामागे हळूवार मग चांदही वरती येतो,
  तळमळत तुझ्या आठवणीत मी तसाच पडून राहतो,
  किती छळणार गं मला अजून,रात्र तुझ्याविन सुनी,
  चंदेरी राती स्वप्नात माझ्या, तु ये "रातराणी"||4||

  ♡♡उदय♡♡

  उत्तर द्याहटवा

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
आयुर्वेदिक वनस्पती व उपचार [Ayurvedic medicines]
these bottles were stored in the apothecary in the hospital dispensary. (Photo credit: Wikipedia ) १- पिपंळ - याला  ' बोधीवृक्ष &#...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...