मुख्य सामग्रीवर वगळा
गब्बरचे चरित्र [Gabbar Singh]
भारतातील महान व्यक्तीपैकी एक म्हणजे गब्बर सिंग होय. पण
चरित्रकरांनी त्यांच्यावर नेहमीच अन्याय केला आहे.
गब्बर यांचे प्रेरणादायी जीवन लोकांना कळावे म्हणून गब्बरचे
हे चरित्र लिहिले आहे.
साधे जीवन व उच्च विचार : गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य
जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष
वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे
काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन
आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे
त्याला ऐशो आराम,विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच
नाही मिळाला. आणि विचारांच्या परिपक्वते बद्दल काय
सांगावे, ‘जो डर गया, सो मर गया’
या सारख्या संवादांनी त्याने जीवनातल्या क्षणभंगुरतेवर
प्रकाश टाकला आहे.
गब्बरची दयाळू प्रवृत्ती : ठाकूरने
गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते.
यामुळेच त्याने ठाकूरचे फक्त दोन हातच कापले.
तो त्याचा गळा हि कापु शकला असता, पण
त्याच्या ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू
दिले नाही.
नृत्य आणि संगीताचा चाहता : ‘मेहबूबा ओ मेहबूबा’
यां गाण्याच्या वेळेस त्याच्या कलाकार हृदयाचा परिचय
मिळतो.
अन्य डाकुंसारखे त्याचे हृदय शुष्क नव्हते.
तो जीवनात नृत्य-संगीत यां कलेंच महत्व जाणून होता.
बसंतीला पकडल्या नंतर त्याच्यातला नृत्य प्रेमी खळबळून
जागा झाला होता.
त्याने बसंतीच्या आत दडलेल्या नर्तकीला ओळखल होत.
तो कलेच्या प्रती आपले प्रेम अभिव्यक्त करण्याचे
कोणतेही कारण सोडत नसे.
अनुशासन प्रिय गब्बर : जेव्हा कालिया आणि त्याचे मित्र
आपल्यावर सोपविलेली कामगिरी पार न पडताच वापस आले
होते, तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले नाही.
आपल्या अनुशासन प्रिय स्वभावाला साजेस वर्तन त्याने केल.
आणि त्या तिन्ही जणांना शासन केले.
हास्य प्रेमी : त्याच्याकडे कमालीचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’
होता.
कालिया आणि त्याचे दोन मित्र
यांना मारण्याच्या पहिले त्याने त्यांना खूप हसविले होते.
कारण हसता हसता या जगाचा त्यांनी निरोप घ्यावा असे
त्याला मना पासून वाटत होते.
तो आधुनिक युगातला ‘लाफिंग बुढ्ढा’ होता.
नारीच्या प्रती संम्मान : बसंती सारख्या सुंदर
मुलीला पकडल्या नंतर त्याने तिच्याकडे फक्त
एका नृत्याची विनंती केली.
आत्ताचा डाकू असता तर त्याने कदाचित वेगळंच
काही तरी मागितल असत.
भिक्षुकी जीवन : त्याने हिंदू धर्म आणि महात्मा बुध्द
यांनी दाखविलेला भिक्षुकी मार्ग स्वीकारला होता.
रामपूर आणि इतर गावामधून त्याला जे काही मिळत त्यानेच
तो आपले भगवत होता.
सोने, चांदी, चिकन बिर्याणी, मलाई, पनीर टिक्का इ.
भोगविलासी वस्तूंसाठी तो कधी शहराकडे नाही गेला.
सामाजिक कार्य : एकीकडे आपला डाकू पेशा संभाळत
असताना तो लहान मुलांना झोपविण्याचे काम हि करत
होता.
शेकडो माता त्याचे नाव घेऊन आपल्या उनाड मुलांना झोपवत
असत.
सरकारने त्याच्यावर ५०,००० रुयांचे बक्षीस जाहीर केले होते.
त्या काळात ‘कोन बनेगा करोडपती’ नसल्याने
लोकांना रातोरात श्रीमंत
बनविण्याचा गब्बरचा हा प्रामाणिक प्रयत्न होता..
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
KHUP CHHAN
उत्तर द्याहटवाhehehe wah lay bhari
उत्तर द्याहटवाMeaningful and very possitive thoughts
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाIt is really very excellent,I find all articles was amazing.Awesome way to get exert tips from everyone,not only i like that post all peoples like that post.Because of all given information was wonderful and it's very helpful for me.
उत्तर द्याहटवाccna training in chennai thiruvanmiyur