निवडणुकीचे दिवस आले!

Vote!
Vote! (Photo credit: hjl)
निवडणुकीचे दिवस आले!
निवडणुकीचे दिवस आले

नदया नाले साफ झाले,
रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये
डांबर भरले गेले,
रस्ते सगळे नवे नवे,
मिरवणुकीने बहरले!

ते हात जोडलेले
अन मुखवटे हास्याचे,
कित्येक दिवसांनी
माझ्या दारी आले
अन
आश्वासनांची खैरात
वाटून गेले!

आता
जिकडे तिकडे चोहीकडे,
युद्ध फुंकले शब्दांचे!
रोज आरोप प्रत्यारोप
कसे नवे नवे!
निवडणुकीचे दिवस संपले!

पावसाने थैमान घातले,
वारे सारे सोसाट सुटले,
नदया नाले तुडुंब भरले,
साफ करण्या कुणी न आले,

रस्ते सारे झाले खड्डे खड्डे,
ते भरण्या कुणी न उरले,
छप्पर त्याचे उडून गेले,
सावराया त्याला कुणी न आले,

आश्वासने कसेच फोल ठरले,
सगळे कसे अनोळखीच जाहले,
मग त्याने अभाळाशीच नाते जोडले,
अन मातिमधेच जीव त्यागले!

पुह्ना निवडणुकीचे दिवस आले,
त्याच्या आत्महत्येचे,
सगळ्यांनीच भांडवल केले,
पुन्हा तेच आरोप प्रत्यारोप
रोज कसे नवे नवे!
अन युद्ध फुंकले शब्दांचे!

असे कसे ते दिवस रे,
आले, गेले, अन कधी संपले,
नाही कुणाच कळले,
पण
पदरी त्याचा सदैव उणे!

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा