मी ऐकलंय .. [I came to know - marathi poem]

मी ऐकलंय ..
की माझी पत्रे आणि ग्रींटींग जाळतांना
तुझा हात थरथरत होता म्हणून...

मी ऐकलंय
की तो तुला मंगळसूत्र बांधतांना
तुझा जीव तळमळत होता म्हणून...

मी ऐकलंय
की ऊखाणा घेण्यापुर्वी तू
दिर्घ श्वास घेतलास म्हणून...

 मी ऐकलंय
त्याने तुला स्पर्श करण्यापुर्वी तू
डोळे गच्च मिटलेस म्हणून्...

मी ऐकलंय
की त्याला तू भारी पसंत
पडलीस म्हणून...

मी ऐकलंय
की साखर पूडा होताच
तू रड रड रडलीस म्हणून...

मी ऐकलंय
की तुझ्या मैत्रीणी म्हणाल्या
राज'पळपूटा'निघाला म्हणून... 

मी ऐकलंय
की सर्वांचे म्हणणे ऐकून
देखील तू मला दोष नाही दिला म्हणून...

मी ऐकलंय
की तू प्रामानिकपणे त्याला
माझ्या विषयी सांगितले होतेस म्हणून...

मी ऐकलंय
की मुलगा झाल्यास नाव राज ठेवायचे
हे वचन तू त्याला मागितले होतेस म्हणून...

मी ऐकलंय
की गेल्या दोन वर्षांत परिस्थिती
जरा बदलली म्हणून...

मी ऐकलंय
की तू ही आता त्या
धक्क्यातून थोडीफार सावरली म्हणून...

मी ऐकलंय
की कोनितरी परत एकदा म्हटले "जाऊ दे !
राज सुद्दा निघाला मुलगा तसला म्हणून..!!"
पण तू हे ऐकलस का की एवढ्यातच
माझा आत्महत्येचा प्रयत्न फसला म्हणून...???..

-तुझाच.
-----

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा