गणेश चतुर्थी [Ganapati Greetings]

गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. आरतीच्या शेवटी देवें म्हणतात व प्रसाद वाटतात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेला गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून पुढे दहा दिवस साजरा केला जातो. साधारणतः दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाते. – विकि

॥ सुखकर्ता दु:खहर्ता ॥
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१ ॥
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ||ध्रु.||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥२ ॥
लंबोदर पीतांबर फणिवरवंदना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥३ ॥
आभार - मराठी ग्रिटींग्ज.नेट

टिप्पण्या