Image by s.smalling via Flickr |
आवडेल मलाही पाऊस व्हायला…
न सांगता तुझ्या भेटीला यायला …
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला…
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला…
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला…
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
गंध होऊनी श् वासात तुझ्या मिसळायला …
श्वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला…
काळ्या ढगांमधून पळून यायला…
अलगद तुझ्या कुशीत शिरायला…
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
नकळत हृदयात तुझ्या शिरायला …
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला ..
तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला ..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला…
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला…
आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला…
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला…
आवडेल मलाही पाऊस व्हायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला…
एकट्या मनाची सोबत करायला …
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला…
भाळशील का तू माझ्या या रुपाला सांग ना जमेल का तुला साथ द्यायला…
तरच आवडेल मला पाऊस व्हायला…
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
Apratim Kavita aahe hi.............
उत्तर द्याहटवाmala khup manje khup aavadali aahe......
je koni kavi aahet tyana aamjya tarfe khup khup Abhinandan......
Khup chan
उत्तर द्याहटवाkadak...
उत्तर द्याहटवाchan aahe
उत्तर द्याहटवामलाही आवडेल कि, पावसाचा तो एक थेंब व्हायला
उत्तर द्याहटवाआकाशातुन ओढीने येवून, गालावर तुझ्याच सामावून जायला
नकळत का होईना, इतक्या जवळ तुझ्या ओठांच्या यायला
एकाच जादुई स्पर्शासाठी तुझ्या, माझं अस्तिव हि संपवायला
खरंच मलाही आवडेल कि, पावसाचा तो एक थेंब व्हायला...
Wow awesome poem..
उत्तर द्याहटवाखूपच छान आहे कविता
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा