हे क्रांतिकारकांनो...! [marathi-kavita]

Commemorating 62nd Indian Independence DayImage by rAmmoRRison via Flickrबरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला..
देशासाठी आता वेळ आहे कुणाला?
बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला..
खाणं-पिणं, मौज-मजेला वेळ आम्हाला दिला

बरं झालं तुम्ही रक्त-मांस सांडलं..
सिमेंट-विटा समजून आम्ही घर त्यावर बांधलं
बरं झालं तुम्हीच चलेजाव म्हटलं..
संस्कार नि संस्कृतिला सहज आम्ही सोडलं

बरं झालं तुम्ही स्वातंत्र्य मिळविलं..
मुक्तपणे शील आम्ही वेशीला टांगलं
बरं झालं तुम्हीच तिरंगा फडकाविला..
प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला

बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला..
खुर्चीसाठी भांडणे पाहायची वाचला..!

- मुन्ना बागुल
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
Enhanced by Zemanta

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा