Image via Wikipedia
आदर्शांपाठी धावणाऱ्यांनो !द्या गुलाबाच्या काट्याकडे लक्ष
अपमान नम्रतेने झेलून असतो
तो सौंदर्याच्या संरक्षणात दक्ष
झरे जोरात वाहतात आणि सुकतात
शांत समुद्र असतात सखोल
मिरवायला काय सगळेच मिरवतात
पण खरा आदर्श असतो अबोल
धैर्य, शौर्य, सात्वना आणि यश
असनं मिळालेलं सगळंच खोटं
शेवटी त्याच्या घरी सगळेच सारखे
नाही कोणी लहान, नाही मोठं
मला पराजयाची भिती नका दाखवू
माझं जिवनच आहे एक संघर्ष
डोळे उघडून विचार करा
तुम्हीच बना तुमचा आदर्श
-प्रथमेश दिवेकर
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा