धडपड तडफड तुझी चालली रे s s s

Home Guard guiding traffic with the Mumbai PoliceImage by calamur via Flickr

पुण्यातील वाहतुक ...एक “ विचार मंथन ”……विडंबनात्मक पुण्यातील वाहतुक ....( चाल: “ लटपट लटपट तुझ चालणं ग मोठ्या …..” होनाजी बाळा यांची क्षमा मागून )………पुणे तेथे " काय उणे "..यात पहिला नंबर " पुण्याच्या वाहतुकीला शिस्त उणी "... याचा लागेल. रस्त्यातून थोडे बाजूला उभे राहून केलेले हे एक “ विचार
मंथन ”…….

धडपड तडफड तुझी चालली रे पुढे पुढे जाण्याची , घाई तुला लवकर पोहोचण्याची
खेळी ही रे आहे मौतीची...

ऐ s सायकल-वाल्या, रे s स्कूटर-वाल्या, ए s रिक्शा-वाल्या, रे s मोटर्-वाल्या...||

तो बघ सायकल-वाला, “ वन-वे ” तून आला, कसा बिनधास्त ..
नियमांची पर्वा नाही त्यास
मधीच घुसे, कुठेही घुसे, घुसे हा वाहत्या रस्त्यात ... खेळी ही रे आहे मौतीची ||

तो बघ स्कूटर-वाला , घेउन चालला आख्या फॅमिली-ला ,
मामा-ची पर्वा नाही त्याला
कसाही चालवी, पुढे जाई, करी हा “ सर्कस ” रस्त्यात..… खेळी ही रे आहे मौतीची ||

तो बघ रीक्षा-वाला, कोंबून चालला , किती मुलांना ?? ,
धोका त्या बाल-जीवांना,
आपलाच रस्ता समजून चाले , हा आपल्याच मस्तीत… खेळी ही रे आहे मौतीची ...||

आला बघ बस-वाला, कुठे s s थांबला s s, स्टॉप-सोडून,
लोक दमले धावून पळून ,
असून मुजोरी, करी शिरजोरी, धरी हा लोकास वेठीस …..खेळी ही रे आहे मौतीची .. ||

अन पुण्याच्या ट्रैफिकची शोकांतिका बघा......

तो बघ पोलिस-मामा, किती वैतागलेला ?? , पुण्याच्या ट्राफिक-ला ,
काय करावे ?? कळे नाही त्याला ,
“ कण्ट्रोल ” करण्या-ऐवजी, बसला गाड्या उचलीत, रमला नोटा मोजण्यात,
खेळी ही रे आहे चैनीची ... खेळी ही रे आहे पैशांची,

खेळी ही रे आहे मौजेची s s s
खेळी ही रे आहे मौजेची ...s s s


ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या