चार पेग घेता घेता...

Cheers to FriendsImage by Rein Rache via Flickr

चार पेग घेता घेता काल रात्र झाली !
घरी पुन्हा पत्नी वाही शिव्यांची लाखोली ! ॥धृ॥
आम्ही गोड शब्दांची त्या आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?
कडू कारल्याच्या जिभेवरी जर पखाली ! ॥१॥

रोज घाव करिते पत्नीची जिह्वा कट्यारी;
रोज वंश सासरचा ती समूळऽ उद्धारी !
आम्ही गप्प ऐकत असतो आमुची खुषाली ! ॥२॥

अंत:पूर केले आहे बंद आम्हासाठी
ओसरीवरी ती धाडे निजावयासाठी !
आम्ही ते पती की ज्यांना बायको न वाली ! ॥३॥

उठा-बशा काढत काढत संपल्या उमेदी !
असा कसा झालो माझ्या घरी मीच कैदी ?
मी अपार दु:खी, माझी चालली हमाली ! ॥४॥

उभा फ्लॅट झाला आता एक बंदिशाला
जिथे सिंह ताटाखालिल मनी-माऊ झाला !
कसे पुरुष दुर्दैवी अन्‌ स्त्रिया भाग्यशाली ! ॥५॥

धुमसतात अजुनी उदरी भुकेचे निखारे !
अजुन अन्न मागत उठती रिक्त पोट सारे !
दूषणेच पत्नीची ती आम्हाला मिळाली ! ॥६॥

बरसतात ’खोड्या’वरती जिभेचे निखारे !
अजुन रक्त काढत बसती शब्द बोचणारे !
आम्ही महिषरूपी राक्षस; भासते ती काली ! ॥७॥

[उषःकाल होता होता ह्यावरून घेतलेली कविता]
मुन्ना बागुल

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

  1. this poem dedicate my father

    ".....पप्पा...."

    आम्हा वाढवले रक्ताचे पाणी करून,


    पहिले पाउल हि टाकले तुमचा हात धरून,

    पप्पा तुमचा हात पकडून

    चालण्याची सवय कशी काढू मोडून


    ......पप्पा तुम्ही का गेले सोडून..?



    पप्पा आपल्या घरात

    आता ती मज्जा नाही राहिली,


    कित्तेक दिवस झाले


    मम्मी हसताना नाही पाहिली,

    ....ती आज हि रडते आम्हा न देता कळून

    ....पप्पा तुम्ही का गेले सोडून



    पप्पा तुम्ही असताना

    जी नाते नि लोग होते जोडून,

    ते हि वागतात तोडून तोडून..

    ......पप्पा तुम्ही का गेले सोडून



    जगाच्या पाठीवरती नाही

    कोणी आपले,

    तुम्ही आम्हाला किती होते जपले,

    ....आता या गोष्टीची जाणीव

    होते राहून राहून..

    .....पप्पा तुम्ही का गेले सोडून



    पप्पा देवा समोर

    जेंव्हा उभी राहते हात जोडून,

    करते त्याला एकच प्रश्न

    माझ्या पप्पाला का

    घेतलेस आपलेसे करून...???

    प्लीज देवा त्यांना देतोस

    का वापस खाली धाडून...

    ......का गेले पप्पा सोडून

    वाटले तर देवा

    माझा जीव ने काढून...

    पण त्यांना दे धाडून.......

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा