Image by petite corneille via Flickr
आपल्या मराठी परंपरेत भांडणांना महत्वाचं स्थान आहे पण आजच्या या धावपळीच्या जीवनात अस्सल भांडण कुठेतरी लुप्त होत चाललंय लोकांना सोयीनुसार मनसोक्त भांडता यावं म्हणून अखील भारतीय भांडण असोसीएशन ने नागपुरात आपले 'मुजोर भांडण कोचींग क्लासेस' चे केंद्र उघडलेले आहे. इच्छुक भांडखोरया क्लासेस मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात या कोचींग क्लासेस मध्ये अनेक उपयोगी कोर्सेस उपलब्ध आहेतनेत्र मुद्रा भांडण
या कोर्स मध्ये तुम्हाला डोळे मोठे करून व तसेच न बोलता डोळयाच्या हावभावाने भांडण शिकवले जाते याचा उपयोग म्हणजे तुम्ही अचानक आलेल्या पाहुण्यांच्या नकळत केवळ डोळयांद्वारे भांडणांचा आस्वाद घेऊ शकता.
वचावचा भांडण
या कोर्स साठी जोडीदार असणं महत्वाचं आहे ... सासू सून नवरा बायको किंवा नणंद भावजय अशी जोडी असावी हा कोर्स केवळ तीन महीन्याचा आहे यात उखाळे पाखाळे कसे काढायचे व भांडण करतांना घालून पाडून कसं बोलायचे याचे सविस्तर शिक्षण दिले जाईल.
हातापाई भांडण
जर तुम्हाला भांडण विषारद व्हायचं असेल तर वरील दोन्ही कोर्स झाल्यावर तुम्हाला या कोर्स मध्ये ऍडमिशन मिळू शकते हा कोर्स केवळ सहा महीन्यांचा आहे यात आमचे फायटींग एक्सपर्ट तुम्हाला भांडण करतांना हातवारे कसे करायचे शिवाय दोन बायका भांडत असतील तेव्हा एकीने दुसरीचा आंबाडा किंवा वेणी काशीपकडून खेचावी याचे संपूर्ण शिक्षण दिले जाईल.. हा कोर्स करतांना कृपया पदरखोचून यावे...
संबंधित कोर्स साठी संपर्क
श्री मुजोरराव भांडखोरे
चांडाळी रोड, वाटोळ नगर।
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
हा हा लयच भारी
उत्तर द्याहटवावचावचा भांडण हा शब्द खूपच आवडला बर का
जीवनमूल्य
LOL..He He...Sunder post aahe...Great!
उत्तर द्याहटवाLay Bhari.....
उत्तर द्याहटवाmi ata join karnar ahe .....class
लय भारी.....
उत्तर द्याहटवाata me join karnar ahe ha class.....
khupach chhan......
उत्तर द्याहटवाsomthing new.
उत्तर द्याहटवा"I most like the style of writting."