Image by Anders Adermark via Flickr
सय तुझी ही दाटलेली या माझ्या अंतरी
मूक भावनांचा खेळ किती खेळावा परी
काळजातली हुरहूर तुझ्या दाटली माझिया उरी
आतुरलेले क्षण सारे साद घालिती तुझे नेत्र
प्रणयातूर जाहले मी सर्वत्र तुझेच गात्र
धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी
एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी...
ई-मेल फॉरवर्ड - आभार - कवी
lay zhakk
उत्तर द्याहटवा