संत व्हॅलेंटाईनची आरती

New heart purse by CrochettesImage by Alícia via Flickr

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन
आला, आला, आला तो सुदिन ॥ ध्रू ॥
घेती तुझे नाम आज १४-फे
पाठविती एकमेका किती लिफाफे
लिफाफ्यात त्या पत्रिका 'बदामी'
'तूच माझी' अशी प्रत्येकीस हमी!

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन......
आला, आला, आला तो सुदिन

आजच्या दिनी खरेदी प्रचंड
आई-बापांना नसता भूर्दंड
विसरले सारे या देशीचे संत
तू परदेशी पण तूच पसंत

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन
आला, आला, आला तो सुदिन...!

ई-मेल फॉरवर्ड - आभार - कवी

टिप्पण्या

  1. लिहिणारा कोण महाभाग आहे कोणासठाउक , पण आहे बाकी मस्त.. कॉपी करुन इ मेल ने पाठवतोय मित्रांना.. ( तुझ्या ब्लॉगच्या लिंक सहित) :)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा